जात अन धर्माचा दुराभिमान...
जेव्हा आपला जन्म होतो, तेव्हा तो कोणत्या जातीत व्हावा, कोणत्या धर्मात व्हावा हे आपल्या हातात असतं का? नाही ना? मग तथाकथित समाजानं स्वयंघोषित उच्च कुळ व उच्च धर्म समजलेल्या प्रवृत्तीला न ओळखता आपण लहानपणा पासुन हे बाळकडु पित पित मोठे होतो. लहानपणी जात व धर्म काय माहित नव्हतं, पण जसंजसं मोठं होत गेलो तसंतसं समाजानं जात अन धर्माच्या रेषा किती गडद केल्या आहेत? हे लक्षात यायला लागलं.
आपण जातीचा आणि धर्माचा व्यर्थ व मिथ्या दुराभिमान करतो, तेव्हा दुसऱ्यांच्या धर्माला नकळत कमी लेखत असतो.पण लक्षात कोण घेतो?
जोपर्यंत आपण आपली आत्मप्रौढी सोडुन आपण दुसऱ्या जातीत जन्माला आलो असतो तर किंवा दुसऱ्या धर्मात जन्माला आलो असतो तर आणि आपल्याला तशी वागणुक मिळाली असती तर आपण काय केलं असतं? आपल्याला काय वाटलं असतं? याचा खऱ्या संवेदनेतुन विचार विचार करत नाही, तोपर्यंत आपण माणुस म्हणुन कसे म्हणवुन घ्यावे? खोटे दुराभिमान गाडा, अन ममतेनं या जगाकडं पहा. शांततेच्या वाटेवर जाणारा सुलभ कवडसा मनाच्या कोपऱ्या- कोपऱ्यात जावु द्या.
h_amu

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा